• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

पालघर हादरलं! 12 व्या मजल्यावरून पडून 4 वर्षांच्या अन्विकाचा मृत्यू; आईचा आक्रोश

Jul 25, 2025
📰 अरेsss... माझी अन्विका खाली पडली! 12 व्या मजल्यावरून कोसळल्यानंतर आईचा हृदयद्रावक आक्रोश📰 अरेsss... माझी अन्विका खाली पडली! 12 व्या मजल्यावरून कोसळल्यानंतर आईचा हृदयद्रावक आक्रोश

नायगावमधील नवकार फेज वन इमारतीत 12 व्या मजल्यावरून 4 वर्षांची अन्विका पडून मृत्युमुखी; या घटनेचा व्हिडीओ समोर, परिसरात शोककळा

सायली मेमाणे

पालघर (नायगाव)२५ जुलै २०२५ : वसईमधील नायगाव पूर्व येथील नवकार फेज वन या १४ मजली इमारतीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चार वर्षांची अन्विका प्रजापती या चिमुकलीचा बाराव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. ही घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली असून संबंधित घटनेचा काळजाचा ठोका चुकवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्विका तिच्या आई-वडिलांसोबत नवकार फेज वन इमारतीत राहत होती. मंगळवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ती घरात खेळत असताना तिची आई तिला उचलून चपलांच्या स्टँडवर ठेवते. काही क्षणांसाठी आईने तिला नजरचुकीने दुर्लक्ष केल्यावर, अन्विका सरळ खिडकीजवळ जाते आणि त्या खिडकीवर चढते.

दुर्दैवाने त्या क्षणी तिचा तोल गेला आणि ती थेट बाराव्या मजल्यावरून खाली कोसळली. हे पाहताच तिची आई तिला पकडण्याचा आटोकाट प्रयत्न करते, मात्र काही क्षणांचाच उशीर झाल्याने अनर्थ घडतो. व्हिडीओत तिच्या आईचा आक्रोश, घाबरलेले कुटुंबीय आणि परिसरात निर्माण झालेली भीती स्पष्टपणे दिसते.

या अपघातामुळे नवकार फेज वन इमारतीत तसेच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, इमारतीच्या सुरक्षाव्यवस्थेवर आणि बालकांच्या सुरक्षेसाठी पालकांनी घ्यावयाची काळजी यावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी चौकशी सुरू केली आहे. सदर प्रकरणात कोणतीही दुर्लक्ष किंवा दोष असल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

पालकांनी लहान मुलांना एकटे न ठेवणे, खिडकीजवळ किंवा ग्रील नसलेल्या भागांपासून दूर ठेवणे, बालकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे बालकल्याण तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

🕯️ अन्विकाच्या दुःखद मृत्यूमुळे सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात असून अनेकांनी या घटनेमुळे मुलांच्या सुरक्षेची जाणीव अधिक तीव्र झाली असल्याचे म्हटले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune