पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: टोळीप्रमुखासह दहा सराईत गुन्हेगार तडीपार

0
पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: टोळीप्रमुखासह दहा सराईत गुन्हेगार तडीपार

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: टोळीप्रमुखासह दहा सराईत गुन्हेगार तडीपार

पुणे पोलिसांची सणासुदीत मोठी कारवाई. लोणीकाळभोर, कोंढवा आणि वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून टोळीप्रमुखासह 10 सराईत गुन्हेगारांना तडीपार. जाणून घ्या सविस्तर माहिती.

सायली मेमाणे

पुणे २१ ऑगस्ट २०२५ : पुणे : पुणे पोलिसांनी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करत दहाजणांना तडीपार केले आहे. लोणीकाळभोर, कोंढवा आणि वानवडी पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील हे सराईत गुन्हेगार असून त्यात एका टोळीप्रमुखासह इतर सदस्यांचा समावेश आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी व आगामी काळात होणाऱ्या सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी आदेश काढले असून, या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

सदर तडीपार केलेल्या गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व संपूर्ण जिल्हा परिक्षेत्रातून हद्दपार करण्यात आले आहे. अनेक गुन्ह्यांत सहभागी असलेले हे आरोपी समाजात दहशत निर्माण करत असल्याची पोलिसांची नोंद आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी तातडीने ही धडक कारवाई करण्यात आली.

या कारवाईमुळे पुण्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असून, पोलिसांची ही धडक पाऊल उचल नागरिकांत दिलासा निर्माण करणारी ठरली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed