२०२९ च्या रणांगणात पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’ संघर्ष? रोहित पवारांचे बारामतीतून ‘त’ सूचक वक्तव्य

0
२०२९ च्या रणांगणात पुन्हा 'पवार विरुद्ध पवार' संघर्ष? रोहित पवारांचे बारामतीतून 'त' सूचक वक्तव्य

२०२९ च्या रणांगणात पुन्हा 'पवार विरुद्ध पवार' संघर्ष? रोहित पवारांचे बारामतीतून 'त' सूचक वक्तव्य

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचे सूचक विधान; २०२९ मध्ये ‘पवार विरुद्ध पवार’ संघर्षाची शक्यता. जय पवार, युगेंद्र पवार यांचा उल्लेख करत राजकीय समीकरणांना उधाण.

पुणे २३ एप्रिल २०२६ : बारामती:बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच, आगामी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापले आहे. जय पवार यांनी २०२९ ला उमेदवारीबाबत केलेल्या विधानावर भाष्य करताना आमदार रोहित पवार यांनी भविष्यात पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना रंगण्याचे संकेत दिले आहेत. जय पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार हे मैदानात असू शकतात, अशी शक्यता वर्तवत त्यांनी बारामतीच्या राजकारणात नवीन पिढीतील संघर्षाची ठिणगी टाकली आहे.

तपासाच्या गतीवर आणि राजकीय समीकरणांवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, लोकसभेला ज्याप्रमाणे नणंद-भावजय असा संघर्ष झाला, तसाच प्रकार भविष्यातही घडू शकतो. “त्यांचा स्वतंत्र पक्ष असून ते कोणताही निर्णय घेऊ शकतात; मात्र जर सुनेत्राकाकी उमेदवार नसतील, तर समोर जो कोणी असेल त्यांच्या विरोधात सर्वपक्षीय लढाई अटळ आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. पवारांच्या कौटुंबिक राजकारणात आता उमेदवारीच्या निमित्ताने उघडपणे दोन गट पडल्याचे यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

पवार कुटुंबियांनी पुन्हा एकत्र यावे, ही लोकांची आणि अजित पवारांची भावना असली, तरी राजकीय वास्तव्य मात्र वेगळे असल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले. राजकीयदृष्ट्या काही चांगल्या गोष्टी घडण्यासाठी कठीण निर्णय घ्यावे लागतात, असे सांगत त्यांनी सध्याच्या परिस्थितीत एकत्रीकरण कठीण असल्याचे स्पष्ट केले. सत्तेतून बाहेर पडणे आणि कार्यकर्त्यांच्या भावना सांभाळणे हा तांत्रिकदृष्ट्या सोपा निर्णय नसून, आज आम्ही एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहोत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, पवार विरुद्ध पवार असा सामना व्हावा ही जनतेची इच्छा नसून, हा काही राजकीय नेत्यांचा कट असल्याचा आरोपही त्यांनी केला. “काही जणांना बारामतीचे आणि ‘पवार ब्रँड’चे वलय संपवायचे आहे, म्हणूनच ते जाणीवपूर्वक कुटुंबात फूट पाडण्याचे काम करत आहेत,” असे सांगत रोहित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला. एकूणच बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या मतदानादिवशीच २०२९ च्या उमेदवारीची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed