पवार-ठाकरे की काँग्रेस? महाविकास आघाडीच्या एकमेव जागेवरून मित्रपक्षांत का’ जुंपली’…

0
पवार-ठाकरे की काँग्रेस? महाविकास आघाडीच्या एकमेव जागेवरून मित्रपक्षांत का' जुंपली'…

पवार-ठाकरे की काँग्रेस? महाविकास आघाडीच्या एकमेव जागेवरून मित्रपक्षांत का' जुंपली'…

विधानपरिषदेच्या 10 जागांच्या निवडणुकीत मविआच्या एकमेव सुरक्षित जागेवर काँग्रेसचा दावा; मातोश्रीवरील बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष.

पुणे २३ एप्रिल २०२६ : मुंबई: विधानपरिषदेच्या आगामी १० जागांच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, महाविकास आघाडीमध्ये (मविआ) एका जागेवरून मोठा संघर्ष उभा ठाकला आहे. संख्याबळानुसार मविआच्या वाट्याला केवळ एक जागा सुरक्षित असताना, आता त्या जागेवर काँग्रेसने आपला हक्क सांगितला आहे. या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मविआच्या जागावाटपाचा तिढा सुटणार की संघर्ष वाढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


निवडणुकीच्या गणितानुसार, सत्ताधारी महायुतीचे ९ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, तर दहाव्या जागेसाठी मविआकडे पुरेसे संख्याबळ आहे. सध्या उद्धव ठाकरे यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपत असल्याने ही जागा प्रामुख्याने ठाकरे गटाची मानली जात होती. मात्र, काँग्रेसने या जागेवर दावा केल्याने मित्रपक्षांतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. ठाकरे स्वतः पुन्हा रिंगणात उतरणार की आपल्या एखाद्या विश्वासू नेत्याला संधी देणार, यावरून सस्पेंस कायम असतानाच काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

काँग्रेसच्या या दाव्यामागे मागील राज्यसभेच्या निवडणुकीतील ‘त्यागा’ची पार्श्वभूमी आहे. “मागील निवडणुकीत ठाकरे गटाच्या आग्रहाखातर आम्ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा दिला होता, त्यामुळे आता विधानपरिषदेच्या जागेवर आमचा हक्क अधिक प्रबळ आहे,” अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली आहे. हर्षवर्धन सपकाळ या भेटीदरम्यान हाच मुद्दा उपस्थित करून उद्धव ठाकरेंना निर्णयाचा फेरविचार करण्यास भाग पाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाविकास आघाडीच्या एकीची ही खऱ्या अर्थाने कसोटी असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा तिढा सोडवणे दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचे आहे. जर ही एकमेव जागा काँग्रेसला मिळाली, तर ठाकरे गटाला आपला प्रतिनिधी सभागृहात पाठवता येणार नाही आणि जर ठाकरे गटाने ही जागा लढवली, तर काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटू शकतो. त्यामुळे ‘मातोश्री’वर होणारी ही खलबतं महाविकास आघाडीच्या भविष्यातील रणनीतीसाठी आणि जागावाटपाच्या फॉर्म्युलासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed