• Sat. Jul 19th, 2025

NewsDotz

मराठी

मुंबईत दोन तरुणांवर अमानवी अत्याचार; कर्ज फेडले नाही म्हणून लैंगिक छळ, आरोपींना अटक

Jul 15, 2025
मुंबईत दोन तरुणांवर अमानवी अत्याचारमुंबईत दोन तरुणांवर अमानवी अत्याचार

कर्ज न फेडल्याच्या रागातून दोन तरुणांवर अत्याचार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, मुंबईतील धक्कादायक घटना.

सायली मेमाणे

मुंबई १५ जुलै २०२५ : महानगरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. केवळ उधार दिलेले पैसे वेळेवर न फेडल्याने दोन तरुणांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. आरोपींनी दोघांनाही मारहाण केली, त्यांच्यावर मुखमैथुन करण्यास भाग पाडले आणि या घटनेचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

पीडितांपैकी एक अल्पवयीन असून दुसरा १९ वर्षांचा युवक आहे. या संतापजनक प्रकाराची पोलिसांकडे दिलेली तक्रार पीडितांपैकी एकाच्या आईने केली आहे. तिने थेट पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण प्रकार उघड केला असून, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुख्य आरोपी दिलीप गोस्वामी उर्फ ऋतिक याने पीडित युवकाला पुण्यात नेले. त्याच्यासोबत धीरज, पंजूभाई गोस्वामी आणि भरत हे तिघे मित्र देखील होते. प्रवासादरम्यान कारमध्ये दोघांना बेल्टने मारहाण करण्यात आली. पुण्यावरून परतल्यानंतर आरोपींनी पीडित तरुणांना दक्षिण मुंबईतील भुलेश्वर येथील एका ठिकाणी डांबून ठेवले.

त्या ठिकाणीही आरोपींनी त्यांना अमानवी वागणूक दिली. दोघांनाही जोर-जबरदस्तीने मुखमैथुन करण्यास भाग पाडले गेले. आरोपींनी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीने पीडित युवक अधिकच घाबरले.

मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रमुख आरोपी दिलीप गोस्वामी याला अटक केली आहे. उर्वरित आरोपी – धीरज, पंजूभाई गोस्वामी आणि भरत – हे फरार असून, त्यांचा शोध सुरु आहे. पीडित युवकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची मानसिक स्थितीही अतिशय नाजूक आहे. तज्ञ समुपदेशकांच्या मदतीने त्यांना मानसिक आधार दिला जात आहे.

या घटनेमुळे मुंबईत पुन्हा एकदा समाजमाध्यमांचा गैरवापर, कर्ज वसुलीतील बेकायदेशीर कृत्ये आणि लैंगिक छळ या प्रश्नांवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी अधिक कठोर आणि त्वरेने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, कोल्हापूर शहरातील भडगाव रोडवरील साई उद्यानाजवळ पोलिसांनी मटका जुगार अड्ड्यावर कारवाई करत १२ जणांना अटक केली आहे. गडहिंग्लज पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत चार महिला कामगारांसह मटका बुकी शंकर माळी यालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सुमारे ४ लाख ४ हजार ११३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गोपनीय माहितीवरून करण्यात आली असून, परिसरात अशा अनधिकृत अड्ड्यांवर लक्ष ठेवले जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune