शिरूर तहसील कार्यालयात प्लॉटिंग विरोधात तक्रार करणाऱ्या अपंग व्यक्तीवर प्रसारात धमकी व अपमान; आरोपीवर पोलिसांकडून कारवाई.
सायली मेमाणे
शिरूर १५ जुलै २०२५ : पुणे जिल्ह्यातील शिरूर तहसील कार्यालयात प्लॉटिंग विरोधात तक्रार करणाऱ्या अपंग व्यक्तीवर अपमानास्पद वागणूक आणि धमक्या दिल्या गेल्या आहेत. या घटनेची तक्रार तक्रारदार अशोक रावसाहेब भोरडे यांनी केली असून, त्यामुळे शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भोरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सव्वा सहा ते पावणे सात दरम्यान कार्यालयात तहसीलदार बाळासो म्हस्के यांच्या उपस्थितीत प्लॉटिंग व्यवसायिक राहुल शंकर करपे यांनी जोरदार आरडा-ओरडा केला. “कोणी माकड उठून आमच्या प्लॉटिंगची तक्रार करणार? आम्ही आठ-दहा कोटी गुंतवलेत,” असे बोलून त्यांनी भोरडे यांना धमकी दिली आणि शाब्दिक अपमान केले .
अशोक भोरडे यांनी तळेगाव ढमढेरे व निमगाव म्हाळुंगी मधील अनधिकृत प्लॉटिंगविरोधी तक्रारी संबंधित लेखी स्वरूपात तहसील आणि पीएमआरडीए कार्यालयात केल्या होत्या. दस्त नोंदणी थांबवले गेल्यावर, राहुल करपे यांनी मानसिक भय निर्माण करून धमक्या दिल्या असल्याचा आरोप भोरडे यांनी केला आहे .
या ऐतिहासिक अपमानकारी घटनेचा व्हिडिओ अक्षय टेमगिरे यांच्या मोबाइलमध्ये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पूर्वी देखील करपे यांनी भोरडे यांच्यावर धमक्या दिल्याने शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झालेली होती.
या प्रकरणाचा तपास शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी संदेश केंजळे आणि सहायक पोलीस निरीक्षक दीपक करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे.
राहुल करपे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, परंतु त्यांनी कायदेशीर लढाईची तयारी असल्याचे सांगितले आहे
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter