• Mon. Jul 28th, 2025

NewsDotz

मराठी

पुणे बुधवार पेठ घोटाळा: वेश्याव्यवसायाच्या नावाखाली ब्लॅकमेल; दोघांना अटक

Jul 16, 2025
पुणे बुधवार पेठ घोटाळा: वेश्याव्यवसायाच्या नावाखाली ब्लॅकमेल; दोघांना अटकपुणे बुधवार पेठ घोटाळा: वेश्याव्यवसायाच्या नावाखाली ब्लॅकमेल; दोघांना अटक

पुण्यात बुधवार पेठेत वेश्यागमनाच्या आरोपाखाली नागरिकांना धमकावून पैसे उकळणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी घरापर्यंत पाठलाग करत खोट्या तक्रारी केल्या होत्या. पुणे पोलिसांची तत्काळ कारवाई.

सायली मेमाणे

पुणे १६ जुलै २०२५ : पुणे – शहरातील बुधवार पेठ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वेश्याव्यवसायामुळे सतत चर्चेत असलेल्या या भागातील संदर्भात, दोन तरुणांना लक्ष्य करून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, आरोपींनी संबंधित व्यक्तींचा घरापर्यंत पाठलाग केला आणि नंतर त्यांना समाजात बदनाम करण्याची धमकी देत खंडणी मागितली. पुणे पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली आहे.

घटनेच्या तपशीलानुसार, फिर्यादी बुधवार पेठ परिसरातून परत आपल्या घरी जात असताना आरोपी आयुष राजू चौगुले आणि सदफ पठाण या दोघांनी त्यांचा पाठलाग केला. आरोपी घरापर्यंत पोहोचले आणि “तुम्ही आमच्याकडून २० हजार रुपये ऑनलाईन देतो असं सांगून कॅश घेतली, आता ती रक्कम द्या, नाहीतर तुम्हाला समाजात बदनाम करू” अशी धमकी दिली. त्यांनी यावरच न थांबता पोलीस हेल्पलाइन क्रमांक 112 वर कॉल करून बनावट तक्रारही केली. त्यांनी पोलिसांना सांगितले की, फिर्यादीने त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत.

या कॉलनंतर नांदेड सिटी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सखोल चौकशी केली. तपासात हे समोर आले की, आरोपी हे अशा प्रकारे नागरिकांना सापळ्यात अडकवून खोटे आरोप करत त्यांच्याकडून पैसे उकळत होते. पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात खंडणी, धमकी आणि फसवणुकीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे बुधवार पेठ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. वेश्याव्यवसायाच्या नावाखाली सामान्य नागरिकांना अडकवून बदनामीची भीती दाखवून पैसे उकळण्याच्या प्रकारांनी नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. पुणे पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद असून, या प्रकरणाच्या अनुषंगाने सखोल चौकशी आणि या टोळीतील अन्य संबंधितांचीही चौकशी करण्यात येणार आहे.

नागरिकांनी अशा प्रकारच्या ब्लॅकमेलिंगपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, कुठलाही संशयास्पद प्रसंग आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune