पुण्यात विमाननगर परिसरात तडीपार आदेशाचे उल्लंघन करून वावरत असलेला उमेश केंदळे पोलिसांनी पकडला. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून अटक केली असून महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १४२ अंतर्गत गुन्हा दाखल.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे २६ जुलै २०२५ :– विमाननगर परिसरात तडीपार आदेशाचे उल्लंघन करून वावरत असलेला आरोपी उमेश गौतम केंदळे (वय २८, रा. एस. आर. ए. बिल्डिंग १०८, ई विंग, विमाननगर, पुणे) याला विमानतळ पोलीस ठाण्याच्या पथकाने २२ जुलै २०२५ रोजी अटक केली आहे. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करत आरोपीला जेरबंद केले असून, महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १४२ अंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड व पोलीस उपनिरीक्षक गणेश साळुंके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार चांदेकर, पिसाळ, पोशि बर्डे आणि आवारी यांच्या पथकाने विमाननगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना आरोपीच्या हालचालींबाबत माहिती मिळाली. माहितीवरून पोलिसांनी त्वरित पावले उचलत एस.आर.ए. बिल्डिंग शेजारील मोकळ्या जागेत सापळा रचून उमेश केंदळेला अटक केली.
तपासात उघड झाले की, पुणे शहर पोलीस परिमंडळ ४ चे उपआयुक्त यांनी १९ डिसेंबर २०२३ रोजी उमेश केंदळे याच्यावर दोन वर्षांसाठी तडीपार आदेश (अ.क्र. ४९/२०२३) लागू केला होता. या आदेशाचे उल्लंघन करत तो पुन्हा पुणे शहरात वावरत असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत कडक कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter