• Wed. Jul 23rd, 2025

NewsDotz

मराठी

हवाई सुंदरी प्रशिक्षण केंद्रावर पगार रखडवण्याचे आरोप; कर्मचाऱ्यांची आक्रमक भूमिका

Jul 23, 2025
पुणे – शहरातील एका नामांकित हवाई सुंदरी प्रशिक्षण केंद्राविरोधात कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेतपुणे – शहरातील एका नामांकित हवाई सुंदरी प्रशिक्षण केंद्राविरोधात कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत

पुण्यातील एका हवाई सुंदरी प्रशिक्षण संस्थेने दोन महिन्यांचे पगार रखडवल्यामुळे कर्मचारी संतप्त; उडवा-उडवीच्या उत्तरांमुळे व्यवस्थापनावर गंभीर आरोप.

सायली मेमाणे

पुणे २३ जुलै २०२५ : पुणे – शहरातील एका नामांकित हवाई सुंदरी प्रशिक्षण केंद्राविरोधात कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. दोन महिन्यांचा पगार रखडवल्याने हतबल झालेले कर्मचारी आक्रमक झाले असून, वेतनाबाबत विचारणा करताच व्यवस्थापनाकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका खासगी प्रशिक्षण संस्थेमध्ये हवाई सुंदरी व इतर विमानसेवा क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जाते. येथे काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. हे प्रकरण उघड झाल्यानंतर संबंधित संस्थेतील प्रशासनाने कर्मचाऱ्यांशी उघड संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रकार केल्याचे समोर आले आहे.

कर्मचाऱ्यांच्या मते, कामाचे वेळापत्रक काटेकोर असूनही पगार वेळेवर मिळत नाही. यासंदर्भात अनेकदा लेखी व मौखिक तक्रारी केल्या गेल्या, मात्र व्यवस्थापनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. इतकेच नव्हे, तर पगाराची विचारणा केली असता काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचीही धमकी देण्यात आली.

एका कर्मचाऱ्याने सांगितले की, “आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. पण गेल्या दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. घरखर्च, कर्ज आणि इतर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. व्यवस्थापनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नाही.”

या प्रकारामुळे कर्मचारी मानसिक दृष्ट्या त्रस्त झाले आहेत. काही कर्मचाऱ्यांनी काम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित प्रशिक्षण केंद्राने या प्रकरणाची दखल घेऊन पगार तातडीने अदा करावा, अशी मागणी होत आहे.

शासन आणि कामगार आयुक्तालयाने या प्रकाराची चौकशी करून संबंधित संस्थेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. कामगार कायद्यानुसार, वेळेवर पगार न देणे हा गुन्हा आहे आणि कामगारांना धमकावणे हे अधिक गंभीर आहे.

जर संबंधित संस्था यावर तातडीने पावले उचलत नसेल, तर कर्मचारी कायदेशीर मार्गाने आपला हक्क मिळवण्यासाठी पुढे जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune