• Thu. Jul 24th, 2025

NewsDotz

मराठी

नवी मुंबईतील व्यापाऱ्याची ऑनलाइन तीन पत्ती गेममुळे पावणे तीन कोटींची फसवणूक

May 22, 2025
तीन पत्तीच्या नादात व्यापाऱ्याचे पावणे तीन कोटी रुपये गमावलेतीन पत्तीच्या नादात व्यापाऱ्याचे पावणे तीन कोटी रुपये गमावले

नवी मुंबईत तीन पत्ती गेमच्या नादात एका व्यापाऱ्याला तब्बल पावणे तीन कोटींचे नुकसान. फसवणूक प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल.
सायली मेमाणे,

Pune : २२ मे २०२४ : नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याला ऑनलाईन जुगाराच्या नादात मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. सुनीलकुमार सिंह या व्यावसायिकाला ‘सॅट स्पोर्ट डॉट कॉम’ नावाच्या एका गेमिंग वेबसाईटवर तीन पत्ती आणि कॅसिनोसारखे गेम खेळण्याचे व्यसन लागले. काही वेळा जिंकण्याचा अनुभव आल्यामुळे त्यांनी मोठ्या रकमा डिपॉजिट केल्या. त्यांनी एकूण ३ कोटी २४ लाख ८४ हजार रुपयांची गुंतवणूक या वेबसाईटवर केली होती.

सुरुवातीला थोडी रक्कम परत मिळाल्यामुळे विश्वास निर्माण झाला, मात्र नंतर अचानक त्यांचे गेमिंग खातेच बंद झाल्याचे लक्षात आले. फक्त ५० लाख रुपयांची रक्कमच ते काढू शकले आणि उर्वरित २ कोटी ७४ लाख रुपये अडकले. या प्रकरणी सुनीलकुमार यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी वेबसाईट आणि व्हॉट्सअपवरून संपर्क साधणाऱ्या क्रमांकांविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

प्राथमिक तपासातून ही वेबसाईट आणि संबंधित फोन नंबर परदेशातून ऑपरेट केल्याचे आढळले आहे. पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, ऑनलाइन गेमिंगच्या आहारी जाऊन आर्थिक संकट ओढवू नये याची जाणीव ठेवण्याचे आवाहनही केले आहे.