मुंबई महापालिकेच्या वातावरण अर्थसंकल्पीय अहवालात पर्यावरणपूरक योजनांसाठी सात हजार कोटींपेक्षा अधिक निधी राखण्यात आला आहे. वाचा मुंबईतील पर्यावरण सुधारणा आणि निधीविषयी सखोल माहिती.
सायली मेमाणे
पुणे ६ जून २०२५ : पर्यावरणपूरक योजना या संकल्पनेला मुंबई महापालिकेने मोठे महत्त्व दिले आहे. शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे आणि पर्यावरणीय समस्यांवर मात करण्यासाठी महापालिकेने २०२४-२५ आणि २०२५-२६ या आर्थिक वर्षांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी राखला आहे. मुंबई महापालिकेच्या विविध कामांमध्ये आणि प्रकल्पांमध्ये पर्यावरणपूरकतेला प्राधान्य देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे, पर्यावरणपूरक योजना मुंबईसाठी केवळ धोरण नसून, शहराच्या शाश्वत विकासासाठी अनिवार्य पाऊल मानले जाते.
मुंबई महापालिकेने २०२४-२५ मध्ये पर्यावरणपूरक योजना साठी जवळपास ७,८७७ कोटी रुपये खर्च केले असून १०,२२४ कोटी रुपयांच्या तरतुदींपैकी मार्च २०२५ पर्यंत ८६.२६ टक्के निधी खर्च झाला आहे. २०२५-२६ साली महापालिकेने भांडवली खर्चासाठी १७,०६६ कोटी रुपये तर महसुलीसाठी ३,२६८ कोटी रुपये राखले आहेत. यातून फक्त महापालिकेच्या कामांसाठी १६,३२१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, हा निधी मागील वर्षीच्या तुलनेत ३८% ने वाढला आहे.
पर्यावरणपूरक योजना अंतर्गत मुंबईमध्ये पर्जन्यजलवाहिन्या, मलनिसारण प्रकल्प, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता या विभागांमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. ऊर्जा बचत, एकीकृत वाहतूक, शाश्वत कचरा व्यवस्थापन, हरित क्षेत्रांचा विकास, जैवविविधता संवर्धन, वायू गुणवत्ता सुधारणा, पूर व्यवस्थापन आणि जलसंपदा या क्षेत्रांमध्येही महत्त्वाचे प्रकल्प राबवले जात आहेत.
महापालिकेचा पर्यावरणपूरक योजना संदर्भातील वातावरणीय अर्थसंकल्पाचा मुख्य उद्दिष्ट शहरातील पर्यावरणीय समस्या कमी करणे, प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे आहे. यासाठी ऊर्जा, जलसंपदा आणि कचरा व्यवस्थापनावर विशेष भर दिला जात आहे.
मुंबईत एकल वापराच्या प्लास्टिकचा मोठा पर्यावरणीय परिणाम जाणवतो. पावसाळ्यापूर्वी नाले साफ करताना नाल्यांतून गाळापेक्षा अधिक प्लास्टिक सापडत असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका प्लास्टिकविरोधी कठोर कारवाई करत असून प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न राबवत आहे.
२०२५-२६ मध्ये मुंबई महापालिकेने बेस्ट (मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट) उपक्रमालाही वातावरणीय अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट केले आहे. बेस्टसाठी भांडवली खर्च १८४९ कोटी असून त्यापैकी ४३.२५% निधी पर्यावरणाशी संबंधित प्रकल्पांसाठी राखण्यात आला आहे.
२०२४-२५ मध्ये पर्जन्य जलसंचयन आणि मलनिसारणासाठी २,१६३ कोटी तर २०२५-२६ मध्ये ३,०७४ कोटी रुपये राखण्यात आले आहेत. महसुली खर्चामध्येही ४३.२५ टक्के निधी पर्यावरणीय प्रकल्पांसाठी वापरला जाणार आहे. या निधीचा उपयोग करून मुंबईत पर्यावरणपूरक पर्यावरणपूरक योजना च्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रण, जलस्रोत व्यवस्थापन, आणि शाश्वत विकास साध्य करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न सुरू आहे.