NIPM पिंपरी-चिंचवड-चाकण विभागाच्या निवडणुकीत भक्ती शक्ती HR प्रोग्रेसिव्ह पॅनलने सर्व 10 जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक यश मिळवले.
पिंपरी-चिंचवड 30 जून २०२५ : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनल मॅनेजमेंट (NIPM) च्या पिंपरी-चिंचवड-चाकण विभागासाठी 2025–2027 या कालावधीसाठी झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीत भक्ती शक्ती HR प्रोग्रेसिव्ह पॅनलने एकहाती दणदणीत विजय मिळवला आहे. दि. 22 ते 28 जून दरम्यान पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर हॉटेल क्रियाड येथे झालेल्या मतमोजणीत पॅनलने सर्व 10 जागांवर विजय मिळवून संघाची ताकद सिद्ध केली.
या निवडणुकीत पॅनलचे चेअरमन नवनाथ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप मानेकर यांची अध्यक्षपदी, अर्जुन माने यांची उपाध्यक्षपदी, नवनाथ सूर्यवंशी यांची सन्माननीय सचिवपदी, राहुल निंबाळकर यांची अतिरिक्त सचिवपदी आणि चॅप्टरच्या पहिल्या महिला कोषाध्यक्षा म्हणून प्रीती पाटील यांची निवड करण्यात आली. याशिवाय कार्यकारिणी सदस्य म्हणून अमित देशपांडे, अनु सेठी, महेंद्र फणसे, निलेश नाफडे आणि संपत पारधी यांचीही निवड झाली.
विशेष म्हणजे NIPM चे भारतभर 56 चॅप्टर्स असून पिंपरी-चिंचवड-चाकण हा एकमेव असा विभाग आहे ज्यात सर्व सदस्य HR क्षेत्रातील कार्यरत व्यावसायिक आहेत. यामध्ये महिलांचे प्रतिनिधित्व लक्षणीय आहे. पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव, पुणे, रांजणगाव, शिरवळ, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या विस्तृत औद्योगिक पट्ट्यांतील HR व्यावसायिकांचा या चॅप्टरमध्ये समावेश आहे.
चॅप्टरच्या कार्यक्षेत्राचा विचार करता, आगामी काळात उद्योग आणि HR प्रतिनिधींच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. नवनिर्वाचित सदस्यांनी हा चॅप्टर केवळ स्थानिक स्तरापुरता न ठेवता राज्यभरात एक प्रेरणादायी उदाहरण ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. यामध्ये तळेगाव चाकणसारख्या भारतातील सर्वात मोठ्या एमआयडीसीच्या भागीदारीत सदस्यसंख्या वाढवण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
निवडणूक पारदर्शक आणि शांततेत पार पडली. यामध्ये निवृत्त कामगार उपायुक्त डॉ. नागेश कुमार यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. विजयी उमेदवारांचा सत्कार एक्साइड बॅटरीजचे संतोष चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाला पुणे चॅप्टरचे चेअरमन कल्याण पवार, संस्थापक अध्यक्ष अमोल कागवडे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुनील सुतावणे, रिजनल व्हाइस प्रेसिडेंट नरेंद्र पाटील, व्हायब्रंट HR ग्रुपचे अध्यक्ष शंकर साळुंखे आणि विविध औद्योगिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
हा विजय HR क्षेत्रातील नव्या नेतृत्वासाठी सकारात्मक संकेत देतो. कौशल्यविकास, मानवी संसाधन व्यवस्थापन आणि व्यावसायिक संवाद यामध्ये नवीन उंची गाठण्याची तयारी भक्ती शक्ती पॅनलने दाखवली आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter