दिल्लीतील हिमांशू लोहिया यांनी अडचणींवर मात करत 10 लाखांपासून स्वतःचा स्टार्टअप सुरू केला, आज 6.5 कोटींचा टर्नओव्हर.
सायली मेमाणे
दिल्ली 30 जून २०२५ : दिल्लीतील हिमांशू लोहिया हे आर्थिक अडचणींवर मात करून यशाचं शिखर गाठणाऱ्या नवउद्योजकांच्या प्रेरणादायी यादीत आज अग्रस्थानी आहेत. घरच्या हालाखीमुळे त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं, रस्त्यावर सिम कार्ड विकली, डिक्शनरी विकल्या; पण हार मानली नाही. आज ते ‘आर्डेंट एडवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड’ या 6.5 कोटी उलाढालीच्या जाहिरात कंपनीचे संस्थापक आहेत.
हिमांशू यांचे बालपण कठीण होतं. वडील ‘डेसू’मध्ये असिस्टंट लाइनमन होते. 2004 मध्ये आईला कॅन्सर झाल्यामुळे घरची आर्थिक स्थिती आणखी खालावली. त्यांना डिप्लोमाचं शिक्षण सोडावं लागलं. सिम कार्ड विक्री आणि नंतर डिक्शनरी विकत विकण्यापासून त्यांची करिअरची सुरुवात झाली. ते सायकलवर 40 किलो पुस्तके घेऊन शाळा व बाजारात विकायला जायचे. ही जिद्दच त्यांच्या यशाची खरी पायरी ठरली.
प्राथमिक संघर्षांनंतर त्यांनी पत्रकारिता व जनसंवादात पदवी घेतली आणि काही वर्षांनी जाहिरात क्षेत्रात प्रवेश केला. 2010 ते 2018 दरम्यान त्यांनी दक्षिण भारतातील एका जाहिरात कंपनीत काम करताना हिंदुस्तान युनिलिव्हर, P&G, फेरेरो रोशर, मॅरिको, फिलिप्स यांसारख्या ब्रँड्ससाठी काम केलं. 2020 मध्ये कोविडच्या काळात त्यांच्या पगारात 50% कपात झाली. कंपनीनं पगार न वाढवल्यानं त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांनी 10 लाख रुपयांची बचत आणि पत्नी सुप्रियाच्या पाठिंब्यावर फक्त पाच कर्मचाऱ्यांसह ‘Ardent Adworld Pvt. Ltd.’ ची स्थापना गुरुग्रामच्या मानेसरमध्ये केली. त्यांच्या पत्नी कोळसा उद्योगात असिस्टंट मॅनेजर असल्यामुळे त्यांच्या स्थिर उत्पन्नाचा आधार हिमांशूंसाठी निर्णायक ठरला.
त्यांच्या स्टार्टअपने पहिल्या तीन महिन्यांतच 70 लाखांचा टर्नओव्हर गाठला. आज कंपनी 6.5 कोटींची उलाढाल करते. 40 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या या कंपनीत डिजिटल मार्केटिंग, POSM, कस्टमाइज्ड रिटेल स्टँड्स, इन-स्टोर कम्युनिकेशन, प्रिंट व पॅकेजिंग सोल्युशन्स इ. क्षेत्रांत सेवा दिली जाते. क्लायंट्सना ब्रँड प्रमोशन आणि मार्केट व्हिजिबिलिटी मिळवून देणे हे या स्टार्टअपचे मुख्य कार्य आहे.
हिमांशू लोहिया यांची ही कहाणी म्हणजे जिथे परिस्थिती प्रतिकूल असेल, तिथे जिद्द आणि मेहनत कशी यश मिळवू शकते याचा सर्वोत्तम उदाहरण. आज ते लाखो तरुणांसाठी प्रेरणा ठरले आहेत — विशेषतः त्यांच्यासारख्या पार्श्वभूमीतील लोकांसाठी ज्यांना मोठं स्वप्न बघायचं आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedIn