• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

पुणे शहरातील वाहतूक कोंडी वाढतेय, रस्ते विस्तारात महापालिकेची ढिसाळ कामगिरी

Jul 26, 2025
हिंजवडी वाहतूक कोंडीवर पोलीस आयुक्त विनय चौबे यांची थेट कारवाई; प्रायोगिक उपाय सुरूहिंजवडी वाहतूक कोंडीवर पोलीस आयुक्त विनय चौबे यांची थेट कारवाई; प्रायोगिक उपाय सुरू

पुणे शहराच्या वेगवान विस्तारानंतरही रस्त्यांचे जाळे फक्त 7–8% भागापुरतेच मर्यादित आहे. वाहतूक कोंडी वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत. महापालिकेकडून रस्त्यांच्या रुंदीकरणास विलंब, निधीची कमतरता आणि भूसंपादन अडथळे हे मुख्य कारण.

सायली मेमाणे

पुणे २६ जुलै २०२५ : पोलीस आयुक्त विनय चौबे यांनी हिंजवडीतील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रत्यक्ष आढावा घेत प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. 11 जुलै रोजी त्यांनी रस्त्यावर उतरून विविध वाहतूक केंद्रांची पाहणी केली आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने अंमलबजावणी होऊ शकणाऱ्या उपायांची सूचना केली. त्यांनी दिलेल्या सूचनांमध्ये महावितरणचे डीपी हटवणे जेणेकरून सेवा रस्त्यावर फ्री लेफ्ट मोकळा होईल, तसेच जांभुळकर चौक व इंडियन ऑईल चौक येथे सर्कल अर्धवट करून वाहतूक प्रवाह सुलभ करण्यासंदर्भातील सूचनांचा समावेश होता. तसेच शेल पेट्रोल पंप

चौकातील उलटी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे आणि माइंडट्री चौकाजवळ वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. डॉलर्स कंपनीजवळील नाल्यावरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले गेले आणि एमआयडीसी सर्कलमध्ये चुकीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांवर बॅरिकेड्स बसवून कारवाई करण्याचे निर्देश दिले. पांडवनगर भागात माण रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण दूर करण्यास सांगण्यात आले. तसेच मेगा पोलीस सर्कल येथे पीएमपीएमएल बससाठी स्वतंत्र जागा तयार केली जाणार आहे.

या पाहणीसाठी पोलीस आयुक्तांसोबत पीएमआरडीए, महावितरण, पीएमपीएमएल, एमआयडीसीचे अधिकारी, वाहतूक शाखा प्रमुख, स्थानिक नगरसेवक आणि “#UnclogHinjawadiITPark” या उपक्रमाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत सादर करण्यात आलेल्या ५७ पानी अहवालामध्ये ३०० नागरिकांच्या सह्या, वाहतूक अडथळ्यांचे जिओ-टॅग केलेले स्थान, आणि सुचवलेले उपाय यांचा समावेश आहे.

आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरात होणाऱ्या वाहनांच्या अत्याधिक गर्दीवर उपाय म्हणून येत्या एक महिन्यासाठी एकेरी वाहतूक, वळवलेल्या मार्गांचे नियोजन, चौकांचे पुनर्रचना, बॅरिकेड्स बसविणे हे सर्व प्रायोगिक तत्वावर राबवले जाणार आहे. यामुळे येत्या तीन ते चार महिन्यांत वाहतूक कोंडीत लक्षणीय घट होण्याची अपेक्षा आहे. नागरिक, प्रशासन, पोलीस आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्या संयुक्त सहभागातून हा उपक्रम राबवण्यात येत असून हिंजवडी परिसरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune