कोल्हापुरात मुसळधार पावसानंतर पंचगंगा नदीला पूर आला असून, वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील १४२ गावांना याचा मोठा फटका बसला आहे.
सायली मेमाणे,
पुणे २४ मे २०२४ : Kolhapur Flood News च्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात हवामानामध्ये अचानक बदल पाहायला मिळत आहेत. जूनपूर्व पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात मोठा धक्का दिला आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे नदीला उन्हाळ्यातच पूर आलेला पाहायला मिळतो आहे, ही अत्यंत अपवादात्मक बाब आहे. या पूरामुळे राजाराम बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक पूर्णतः थांबवावी लागली आहे.
राज्यात सध्या मान्सूनपूर्व जोरदार पावसाची स्थिती आहे. गेल्या काही दिवसांत कोल्हापूर, सातारा, सांगली, आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाली असून, काही गावांमध्ये मदतकार्य हाती घेण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्याची परिस्थितीही चिंताजनक आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात सोलापूरमध्ये तब्बल ११६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे १४२ गावांमध्ये शेती, घरे आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन व्यक्ती वीज पडून मृत्युमुखी पडले असून, ५७ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, सुमारे ८० घरे पडली असून १५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे पिके जलमय झाली आहेत.
Kolhapur Flood News या संदर्भात अधिक सांगायचं झालं, तर पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने वाहतूक विभागाने राजाराम बंधाऱ्यावरून जाणारा रस्ता तात्पुरता बंद केला आहे. ही खबरदारी म्हणून उचललेली पावले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. रात्रीच्या वेळी पावसाचा जोर अधिक जाणवत आहे. यामुळे काही ठिकाणी विजेच्या गडगडाटासह जोरदार वारे आणि अवकाळी पावसाचा अनुभव येतो आहे.
सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पावसामुळे रस्त्यांची मोठी पडझड झाली आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे आणि सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागठाणे-बोरगाव मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन या परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. पूरग्रस्त भागांमध्ये मदतीसाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. हवामान विभागाच्या सूचनांनुसार, पुढील काही दिवस राज्यातील काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.