• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

तळजाई टोळक्याचा दहशतवाद: रस्त्यावर वाहनांची तोडफोड, पोलिसांत गुन्हा

May 29, 2025
तळजाई टोळक्याचा दहशतवादतळजाई टोळक्याचा दहशतवाद

तळजाई वसाहतीत ‘आम्ही तळजाईचे भाई’ असे म्हणत टोळक्याने चार वाहनांची तोडफोड केली; चार आरोपी अटकेत, सहकार पोलिसांत गुन्हा दाखल.
सायली मेमाणे,

पुणे :२९ मे २०२४ :पुण्यातील सहकार नगर परिसरातील तळजाई वसाहतीत काही युवकांच्या टोळक्याने हातात धारदार हत्यारे आणि बांबू घेऊन नागरिकांमध्ये भीती पसरवली. ‘आम्ही तळजाईचे भाई आहोत’ असा घोष करत त्यांनी चार वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून सहकार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चौघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळक्याने २६ मे रोजी सायंकाळी ही घटना घडवून आणली. फिर्यादीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, एका आरोपीने शस्त्र घेऊन त्यांच्यावर धाव घेत धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

सहकार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासात अटक करण्यात आलेले आरोपी हे १८ ते २० वयोगटातील असून, त्यांच्यासोबत एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. चौघांची ओळख पटवली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

या प्रकारामुळे तळजाई वसाहतीतील स्थानिक नागरिकांमध्ये संताप आहे. त्यांना परिसरातील सुरक्षिततेबाबत चिंता वाटू लागली आहे. पोलिसांनी अधिक सतर्कता ठेवत अशा प्रकारच्या घटनांवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी होत आहे. परिसरात CCTV फुटेजद्वारे अधिक तपास सुरू आहे.

तळजाई परिसरात गेल्या काही महिन्यांपासून टोळीधाटी वाढताना दिसत आहे. वर्चस्वासाठी होणाऱ्या या टोळीयुद्धामुळे युवकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. पोलिसांनी अशा टोळक्यांवर कठोर कारवाई करून परिसरात कायदा व सुव्यवस्थेचं रक्षण करावं, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.