• Mon. Jul 28th, 2025

NewsDotz

मराठी

Shubhanshu Shukla: अंतराळात शून्य गुरुत्वात ‘मेजवानी’चा आनंद! शुभांशू शुक्लाची पार्टीचे फोटो VIRAL

Jul 12, 2025
अंतराळात शून्य गुरुत्वात ‘मेजवानी’चा आनंद!अंतराळात शून्य गुरुत्वात ‘मेजवानी’चा आनंद!

अंतराळवीर शुभांशू शुक्लाने ISS मध्ये सहकाऱ्यांसोबत शून्य गुरुत्वात ‘मेजवानी’चा आनंद घेतला; 14 जुलैला भारतात परतणार.

सायली मेमाणे

पुणे १२ july २०२५ : अंतराळातही उत्सवाचं वातावरण असू शकतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, जे सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) आहेत, त्यांनी आपल्या परतीच्या प्रवासापूर्वी सहकाऱ्यांसोबत शून्य गुरुत्वाकर्षणात दणक्यात मेजवानीचा आनंद घेतल्याचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये शुभांशू आणि त्याचे सहकारी हवेत तरंगत जेवणाचा आस्वाद घेताना दिसतात, हे दृश्य कोणालाही थक्क करणारे आहे.

शुभांशू शुक्ला 14 जुलै रोजी अंतराळातून भारताच्या दिशेने आपला परतीचा प्रवास सुरू करणार असून, त्याआधीच्या काही दिवसांत या खास ‘झिरो ग्रॅव्हिटी’ पार्टीने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. आयएसएसमध्ये अशा स्वरूपाचा जेवणाचा अनुभव नेहमीच अनोखा असतो, कारण अन्नपदार्थ हवेत तरंगत असतात आणि त्यांचे सेवनही सावधगिरीने करावे लागते. या मोहिमेतील शेवटच्या आठवड्यांत शुभांशूने सहकाऱ्यांसोबत काही खास पदार्थांची मेजवानी घेतली आणि त्याचे फोटो इस्रोच्या माध्यमातून प्रसिद्ध झाले.

विशेष म्हणजे, मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात शुभांशूने केवळ एक अंतराळवीर म्हणून नव्हे, तर एक प्रयोगशील शेतकरी म्हणूनही काम केलं. त्यांनी ISS वरील प्रयोगशाळेत पेट्री डिशमध्ये मूग आणि मेथीची प्रयोगात्मकरित्या लागवड केली. ही पिके त्यांनी ISS च्या खास फ्रीझरमध्ये जतन करून ठेवली आहेत, जेणेकरून पृथ्वीवर परत आल्यावर त्यावर अभ्यास करता येईल. हा प्रयोग ‘स्पेस फार्मिंग’च्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

शुभांशू शुक्ला यांचा हा संपूर्ण प्रवास केवळ विज्ञानशिक्षणासाठीच नव्हे, तर अंतराळातील मानवी जीवनशैली, पर्यावरण, आणि भविष्यातील जगण्याच्या शक्यता यांचा वेध घेणारा ठरला आहे. अंतराळात स्वतःचे अन्न उगम पावते का, अशा गंभीर प्रश्नांवर त्यांनी कृतीतून उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

यातील फोटोमध्ये जेवणाचे पॅकेट्स, सूपचे फ्लोटिंग पाउच, हवेत फिरणारे चमचे आणि चेहऱ्यावर हास्य असलेले अंतराळवीर पाहायला मिळतात. भारताच्या अंतराळ इतिहासात या प्रकारचा साजरा झालेला ‘जेवणसोहळा’ ही एक आगळीवेगळी नोंद बनली आहे. शुभांशूने अत्यंत व्यावसायिक व प्रयोगशील भूमिकेतून या मोहिमेत सहभाग घेतला आणि तो आता भारतात परतण्याच्या तयारीत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune