पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरात पिस्तुलचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या सोन्या भवारला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून परदेशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुसे जप्त.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे १२ जुलै २०२५ : पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरात दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपीने धानोरी रोडवरील खदानीजवळ पिस्तुलचा धाक दाखवून येणाऱ्या-जाणाऱ्यांना धमकावत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्याला पकडले. आरोपी राज उर्फ सोन्या रविंद्र भवार (वय २४, रा. भिमनगर, विश्रांतवाडी) याच्यावर आधीपासून गुन्हे दाखल असून तो विश्रांतवाडी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
दि. १० जुलै २०२५ रोजी पोलिस अंमलदार संपत भोसले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सोन्या भवार हा धानोरी रोडजवळील खदानी परिसरात हातात पिस्तुल घेऊन नागरिकांना धमकावत आहे. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर पोलिस अंमलदार संपत भोसले, संजय बादरे व अक्षय चपटे यांनी घटनास्थळी सापळा लावून आरोपीला पकडण्याची योजना आखली.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर आरोपी पिस्तुलसह सार्वजनिक ठिकाणी फिरत असून नागरिकांकडे आक्रमक नजरेने पाहत असल्याचे आढळले. पोलिस त्याच्याकडे झेपावताच आरोपीने पिस्तुल कमरेला लपवून घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तातडीने पाठलाग करून त्याला पकडण्यात यश मिळवले. त्याच्याकडून एक विदेशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण सुमारे ₹८५,००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. १७९/२०२५ प्रमाणे आर्म अॅक्ट कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) सह १३५ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ४) सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त (खडकी विभाग) विठ्ठल दबडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक (विश्रांतवाडी) श्रीमती कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, विशाल गाडे, धवल लोणकर, स्वप्नील कांबळे, अक्षय चपटे, किशोर भुसारे, प्रमोद जाधव आणि होना साबळे यांचा समावेश होता.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitte