येरवडा परिसरात हनुमान मंदिराजवळ पत्त्याचा जुगार सुरु असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट‑४ ने छापा टाकत सात आरोपींना ताब्यात घेतले.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे १२ जुलै २०२५ : येरवडा परिसरात हनुमान मंदिराजवळ पत्त्याचा जुगार सुरु असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट‑४ ने छापा टाकत सात आरोपींना ताब्यात घेतले.
पुणे – येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हनुमान मंदिराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये पत्त्याचा जुगार सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट‑४ च्या पथकाने छापा टाकून सात आरोपींना रंगेहाथ अटक केली. आरोपींकडून ४१,५९० रुपये रोख व ५२ पत्त्यांचा कॅट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पो.हवा. हरिष मोरे व पो.अं. देविदास वांढरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. बातमीदारामार्फत माहिती मिळताच खात्री केल्यानंतर तातडीने छापेमारी करण्यात आली. पकडलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- सागर राम पवार (३९, रा. जागृत चौकाजवळ, वडारवस्ती, येरवडा)
- नितीन राजू सरोदे (३३, रा. लक्ष्मी नगर, येरवडा)
- प्रकाश विष्णू कापसे (३४, रा. जयप्रकाश नगर, येरवडा)
- विशाल विकास चव्हाण (२७, रा. दुर्गा माता मंदिराजवळ, वडगाव शेरी)
- विनयशील विठ्ठल धोत्रे (३४, रा. वडार वस्ती, येरवडा)
- करण अशोक गुंजाळ (३०, रा. येरवडा)
- व्यंकटेश अनिल देवकर (३४, रा. येरवडा)
सर्व आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १२(अ) अंतर्गत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (युनिट-४, गुन्हे शाखा, पुणे शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारचे बेकायदेशीर जुगार अड्डे आढळल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्ष किंवा स्थानिक पोलीस ठाण्याला कळवावे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitte