गणपती 2025 साठी एसटी महामंडळाची मोठी घोषणा — 5000 अतिरिक्त एसटी बसेस 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान कोकणात धावणार; गट आरक्षण 22 जुलैपासून सुरू.
सायली मेमाणे
पुणे १५ जुलै २०२५ : Ganesh Festival 2025: कोकणातील गणेशोत्सवाला हजेरी लावणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाकडून मोठी भेट मिळाली आहे. यंदा 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2025 दरम्यान गणपतीसाठी 5000 जादा एसटी बसेस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा कोकणातील लोकांचा जिव्हाळ्याचा सण आहे. एसटी महामंडळ दरवर्षी नफा-तोट्याचा विचार न करता कोकणात विशेष बसेस चालवते. यंदाही 5000 अतिरिक्त बसेस उपलब्ध असणार आहेत.”
आरक्षणाची माहिती
- गट आरक्षणाची सुरुवात: 22 जुलै 2025
- बस धावणार: 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर
- आरक्षणासाठी संकेतस्थळ: npublic.msrtcors.com
- आरक्षण अॅप: MSRTC Bus Reservation App
- तिकिट सवलत:
- महिलांसाठी: 50%
- ज्येष्ठ नागरिकांसाठी: 100%
गेल्या वर्षी एसटी महामंडळाने गणेशोत्सवासाठी 4300 जादा बसेस सोडल्या होत्या. यंदा ती संख्या वाढवून 5000 करण्यात आली आहे. यावर्षी आषाढी एकादशीला देखील महामंडळाने 5200 जादा बसेस चालवल्या होत्या आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
प्रवाशांसाठी सुविधा
एसटी बसस्थानकांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. कोकणातील महामार्गांवर वाहनदुरुस्ती पथक तैनात करण्यात येणार आहे. हे सगळं गणेशभक्तांचा प्रवास अधिक सोयीचा आणि सुरक्षित करण्यासाठीच असल्याचं परिवहन विभागाने स्पष्ट केलं आहे.
मुंबई, ठाणे, पालघर या विभागांमधून या अतिरिक्त बसगाड्या कोकणात धावतील. कोकणात सणाच्या काळात मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेता ही व्यवस्था निश्चितच उपयोगी ठरणार आहे.
जनतेचा प्रतिसाद
सरकारच्या या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेकांनी यावर समाधान व्यक्त केलं असून, गणरायाच्या आगमनासाठी तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter