• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

वाकडजवळ ६ बांगलादेशी घुसखोर पकडले; बीएसएफ आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांची संयुक्त कारवाई

Jul 24, 2025
पिंपरी-चिंचवड पोलिस आणि सीमा सुरक्षा दलाची (BSF) संयुक्त कारवाई : वाकड येथे ६ बांगलादेशी घुसखोर ताब्यातपिंपरी-चिंचवड पोलिस आणि सीमा सुरक्षा दलाची (BSF) संयुक्त कारवाई : वाकड येथे ६ बांगलादेशी घुसखोर ताब्यात

पिंपरी-चिंचवड पोलिस आणि बीएसएफने वाकड येथील पुणे-बेंगळुरू महामार्गावरून ६ बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीर वास्तव्यासाठी अटक केली. मुंबईला पलायन करण्याचा प्रयत्न उधळून लावत, सर्वांना गुवाहाटीमार्गे बांगलादेशात पाठवण्यात आले.

सायली मेमाणे

पिंपरी-चिंचवड, २४ जुलै २०२५ : पिंपरी-चिंचवड पोलिस आणि सीमा सुरक्षा दलाची (BSF) संयुक्त कारवाई : वाकड येथे ६ बांगलादेशी घुसखोर ताब्यात, गुवाहाटीमार्गे केले देशाबाहेर

पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाकड येथील भुजबळ चौकाजवळ पिंपरी-चिंचवड पोलिस आणि सीमा सुरक्षा दलाने (BSF) संयुक्तरित्या राबवलेल्या मोहिमेत ६ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या घुसखोर नागरिकांनी बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश करून पुणे परिसरात वास्तव्य केले होते. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हे आरोपी मुंबईकडे पलायन करण्याच्या तयारीत होते.

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील गुन्हे शाखा युनिट-४ यांना मिळालेल्या खास माहितीनंतर तात्काळ सापळा रचून आरोपींना वाकडमधून ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला चौकशीदरम्यान आरोपींनी दिशाभूल करणाऱ्या गोष्टी सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुढील चौकशीत त्यांच्याकडे बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट पुरावे आढळून आले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

  1. मोहम्मद उस्मान शिराजुन अली शेख
  2. अब्दुल्ला शागर मुल्ला
  3. मोबिन हारून शेख
  4. जहांगिर बिल्ला मुल्ला
  5. मोहम्मद इलाहीन इलियास बिस्वास
  6. तोहीद मुसलेम हसन शेख

सर्व आरोपींना अटक करून पुणे येथील लोहगाव विमानतळावर BSF च्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर दिनांक २२ जुलै २०२५ रोजी विशेष विमानाने त्यांना गुवाहाटी येथे नेण्यात आले आणि BSF च्या देखरेखीखाली त्यांचे बांगलादेशात निर्वासन करण्यात आले.

ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिस आणि BSF यांच्या प्रभावी गुप्तचर प्रणाली आणि समन्वयाचे उदाहरण मानली जात आहे. शहरातील बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अशा कारवायांना मोठे महत्त्व आहे. शहरात अनेक परप्रांतीय नागरिक वास्तव्य करत असून, त्यातील काहीजण बेकायदेशीर मार्गाने देशात प्रवेश करत असल्याने पोलिस यंत्रणा अशा घटकांवर सतत नजर ठेवून आहे.

ही घटना दाखवते की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात बेकायदेशीर घुसखोरीसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, पोलिस यंत्रणा अशा प्रकारच्या हालचालींवर लक्ष ठेवून कठोर कारवाई करत आहेत. नागरिकांनीही अशा संशयित व्यक्तींबाबत माहिती असल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune