• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

2025 उपराष्ट्रपति निवडणूक प्रक्रिया सुरू; ऑगस्टअखेर नवीन उपराष्ट्रपती होणार, कोण होणार उमेदवार?

Jul 24, 2025
📰 ऑगस्टअखेरपर्यंत नवे उपराष्ट्रपती; निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरु, कोणाकोणाची नावं चर्चेत?📰 ऑगस्टअखेरपर्यंत नवे उपराष्ट्रपती; निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरु, कोणाकोणाची नावं चर्चेत?

Vice President Election 2025: जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतिपद रिक्त, निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. ऑगस्टअखेरपर्यंत नवे उपराष्ट्रपती निवडले जाण्याची शक्यता आहे. अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत.

सायली मेमाणे

पुणे २४ जुलै २०२५ : 📰 ऑगस्टअखेरपर्यंत नवे उपराष्ट्रपती; निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरु, कोणाकोणाची नावं चर्चेत?

नवी दिल्ली: देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. या आठवड्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. अधिकृत कार्यक्रमानंतर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात नवीन उपराष्ट्रपती निवडले जाण्याची अपेक्षा आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या मतदानावर ही निवडणूक अवलंबून असते. गृहमंत्रालयाकडून धनखड यांच्या राजीनाम्याची औपचारिक घोषणा झाल्यानंतर निवडणूक आयोगाने तातडीने तयारीला सुरुवात केली. लोकप्रतिनिधी कायदा, 1952 अंतर्गत ही निवडणूक 32 दिवसांच्या आत पार पाडणे आवश्यक आहे.

आयोगाने सांगितले की, ‘इलेक्टोरल कॉलेज’ तयार करण्याचे काम सुरु आहे. यामध्ये लोकसभा व राज्यसभेतील सर्व विद्यमान खासदारांचा समावेश केला जाणार आहे. त्यानंतर निवडणूक अधिकारी आणि सहायकांची नियुक्ती होईल.

या पदासाठी सत्ताधारी पक्ष आणि विरोधक दोघांनाही उमेदवार उभा करण्याचा अधिकार आहे. विरोधी पक्ष उमेदवार देत नसल्यास, सत्ताधारी पक्षाचा उमेदवार बिनविरोध निवडला जाऊ शकतो.

🔍 कोणाची नावे आहेत चर्चेत?

सध्या या पदासाठी विविध नेत्यांची नावे चर्चेत येत आहेत. यात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, राज्यसभा उपसभापती हरिवंश, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा, दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना, तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा समावेश आहे.

त्याशिवाय, लोकसभेच्या माजी उपसभापती रमादेवी यांचे नावही चर्चेत आले आहे. रमादेवी या भाजपच्या माजी खासदार असून त्यांचे पती बृजबिहारी प्रसाद हे बिहारचे माजी मंत्री होते. त्यांची १९९८ साली पाटण्यात हत्या करण्यात आली होती. रमादेवी यांचा आझम खान यांच्याशी झालेला वाद आणि नंतर खान यांच्याकडून संसदेत माफी मागावी लागल्याचा प्रसंगही प्रसिद्ध आहे.

🗳️ पुढील घडामोडींकडे देशाचे लक्ष

उपराष्ट्रपतिपदासाठी कोणत्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत घोषणेनंतर देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune