छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरात कोचिंग क्लासच्या वादातून एका महिलेला घरात घुसून जबर मारहाण करत पायावर नाक घासायला लावण्याचा संतापजनक प्रकार उघड. चार जणांवर गुन्हा दाखल.
सायली मेमाणे
पुणे २५ जुलै २०२५ : छत्रपती संभाजीनगरमध्ये कोचिंग क्लासच्या वादातून महिलेची अमानुष बेअब्रू; जबर मारहाण, पायावर नाक घासायला लावले
छत्रपती संभाजीनगरमधील सर्वेश्वरनगर, सातारा परिसरात कोचिंग क्लासमधील वादातून चिघळलेल्या प्रकरणाने अमानुष हद्द पार केली. एका मुलीच्या आई-वडिलांनी अन्य मुलीच्या घरात घुसून तिच्या आई-वडिलांना जबर मारहाण केली. विशेष म्हणजे संबंधित महिलेला पायावर नाक घासायला लावून माफी मागण्यास भाग पाडल्याचा संतापजनक प्रकार घडला.
संदीप लंके, त्याची पत्नी आणि आणखी दोन अनोळखी आरोपींविरोधात संदीप श्रीधर शिंदे यांनी सातारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांची 17 वर्षीय मुलगी एका खासगी क्लासला जात होती, तिथे लंके यांच्या मुलीसोबत वाद झाल्यानंतर प्रकरण मिटवले गेले होते. मात्र, काही दिवसांनी लंके यांनी शिंदे यांच्या घरी येऊन शिवीगाळ करत हातातील दांड्याने जबर मारहाण केली. छाया शिंदे या मध्यस्थी करण्यासाठी आल्यावर त्यांच्यावरही हल्ला झाला आणि त्यांना ओढून केस धरून मारहाण करण्यात आली.
अत्यंत लाजीरवाणा प्रकार म्हणजे, आरोपींनी छाया शिंदे यांना पायावर नाक घासायला लावून माफी मागण्यास भाग पाडले. जातीवाचक शिवीगाळही केल्याची माहिती फिर्यादीत नमूद आहे. आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यावर पीडित महिला सुरक्षित स्थळी जाऊन पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडित दांपत्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून पुढील तपास सातारा पोलीस करत आहेत.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter