• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

सांगली गुन्हा बातमी: पैशाच्या वादातून खून, आरोपीच्या आईची आत्महत्या; दुसऱ्या घटनेत पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने खून

May 21, 2025
सांगली गुन्हा: खून आणि आत्महत्यासांगली गुन्हा: खून आणि आत्महत्या

सांगलीमध्ये दोन भीषण गुन्हे: एका युवकाची पैशाच्या वादातून हत्या, आरोपीच्या आईची आत्महत्या, तर दुसऱ्या घटनेत पतीने पत्नीचा निर्घृण खून केला. पोलिसांचा तपास सुरू.
सायली मेमाणे,

पुणे २१ मे २०२४ : सांगली जिल्ह्यात एकाच दिवशी दोन धक्कादायक गुन्हे समोर आल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. कवठे महांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे पैशाच्या वादातून एका युवकाची हत्या झाली असून, आरोपीच्या आईने मुलावर खूनाचा आरोप लागल्याचे समजताच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तर दुसऱ्या घटनेत सांगली शहरात पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने खून केल्याने खळबळ उडाली आहे.

कुकटोळी गावात पैशाच्या देवाण-घेवाणीवरून अजित क्षीरसागर या तरुणाचा खून करण्यात आला. या प्रकरणात सुशांत शेजुळ याच्यावर संशय घेतला जात असून त्याने डोक्यात दगड घालून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. खुनाची बातमी गावभर पसरल्यानंतर सुशांतच्या आई विमल शेजुळ यांना या प्रकाराचा जबरदस्त मानसिक धक्का बसला. मुलावर खूनाचा आरोप लागल्याचे समजताच त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना संपूर्ण गावात चर्चेचा विषय ठरली असून कवठे महांकाळ पोलीस तपास करत आहेत.

या घटनेच्या काही तासांतच दुसऱ्या गुन्ह्याने शहर हादरवून सोडले. सांगली शहरातील शिंदे मळा परिसरातील कुरणे गल्लीत पहाटेच्या सुमारास घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून केल्याची घटना घडली. मृत महिलेचे नाव अनिता सीताराम काटकर असून आरोपी पती सिताराम काटकरने खून केल्यानंतर स्वतः पोलिस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली असून संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

सांगली गुन्हा बातमीच्या या दोन्ही घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांकडून दोन्ही प्रकरणांमध्ये कसून तपास सुरू आहे. एका बाजूला पैशाच्या वादातून हिंसक प्रतिक्रिया, तर दुसऱ्या बाजूला कौटुंबिक कलहातून खून यामुळे समाजात मानसिक आरोग्य, संवादाचा अभाव आणि कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत गांभीर्याची गरज अधोरेखित होत आहे.