• Sun. Jul 27th, 2025

NewsDotz

मराठी

मुंबई रिक्षा फसवणूक : १२ किमी प्रवासासाठी ९० हजार रुपये घेतले, आरोपी अटकेत

May 26, 2025
मुंबई रिक्षा फसवणूकमुंबई रिक्षा फसवणूक

अंधेरी ते वांद्रे या १२ किमी प्रवासासाठी एका रिक्षाचालकाने तरुणाकडून ९० हजार रुपये घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सायली मेमाणे,

पुणे २५ मे २०२५. : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एका रिक्षाचालकाच्या लबाडीचा प्रकार उघडकीस आला आहे. अंधेरी ते वांद्रे या अवघ्या १२ किलोमीटरच्या प्रवासासाठी एका तरुणाकडून तब्बल ९० हजार रुपये ऑनलाईन वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अमूल्य शर्मा नावाचा तरुण आपल्या मित्रासोबत अंधेरीत एका पार्टीसाठी गेला होता. पार्टीनंतर पहाटे वांद्र्याला परतताना त्याने रिक्षा पकडली. अमूल्य मुंबईत नवखा असल्याने रस्ते आणि दराचे ज्ञान कमी होते. त्याचा फायदा घेत आरोपीने वांद्र्यापर्यंत पोहोचवल्यानंतर १५०० रुपयांची मागणी केली.

पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करण्यासाठी अमूल्यने आपला मोबाईल रिक्षाचालकाकडे दिला, कारण तो आपला चष्मा हरविल्यामुळे स्क्रीन नीट पाहू शकत नव्हता. याच संधीचा फायदा घेत आरोपीने १५०० ऐवजी थेट ९०,००० रुपये स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केले.

ही बाब अमूल्यच्या लक्षात आल्यानंतर त्याने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून रिक्षाचालकाला शोधून काढले आणि अटक केली. आरोपीकडून रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.