दर्यापूर (अमरावती) येथे घरकुल योजनांत भ्रष्टाचाराचा आरोप; शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अर्बत यांनी शेकडो लाभार्थ्यांसह आंदोलन करत कर्मचाऱ्यांवर पैसे फेकत निषेध केला. प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप.
सायली मेमाणे,
पुणे २५ मे २०२५. : अमरावती : दर्यापूर तालुक्यातील गरिब नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर घरकुल योजनांचा लाभ घेण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अर्बत यांनी आज शेकडो लाभार्थ्यांसह समूह विकास अधिकारी कार्यालयावर धडक दिली. संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने ही कारवाई करण्यात आली.
आरोप असा आहे की, पंचायत समितीचे काही कर्मचारी गरिबांकडून घरकुलच्या चेकसाठी पैसे मागत आहेत. याला विरोध करत अर्बत यांनी संतप्त प्रतिक्रिया देत थेट कर्मचाऱ्यांवर पैसे फेकले. त्यांनी प्रशासनातील निष्काळजीपणावरही जोरदार टीका केली.
या प्रकारामुळे कार्यालयात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या दरम्यान प्रशासनाने गरजू लाभार्थ्यांना वेळेत योजनांचा लाभ मिळावा यासाठी तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.